¡Sorpréndeme!

चहा गुटखा खाण्यापेक्षाही घातक आहे | Tea Latest News | लोकमत मराठी न्यूज | Lokmat Marathi News

2021-09-13 2 Dailymotion

चहा हा अनेकांच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग झाला आहे. चहा पिल्याशिवाय त्यांना काही सुचत नाही. काही व्यक्ती तर चहाच्या एवढ्या आहारी गेलेले असतात कि प्रातर्विधी सुद्धा चहा घेतल्याशिवाय होत नाही. परंतु एका संशोधनानुसार असे आढळले आहे कि चहा गुटखा खाण्यापेक्षाही घातक आहे. सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय तुमच्यासाठी आजारांचे कारण ठरू शकते. खूपच गरम चहा प्यायल्यामुळे एसोफेगस म्हणजे अन्ननलिकेचा कँसर होण्याची शक्यता अनेक पटीने वाढते. मुंबईच्या टाटा
मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार माहिती झाले कि गरम गरम चहा पिल्याने अन्ननळीच्या त्वचेला नुकसान आहे. आणि त्याने कँसर होण्याची शक्यता चारपटीने वाढते. म्हणजे हा धोका गुटखा, तंबाखू आणि सिगारेट सेवनामुळे होणाऱ्या अन्ननलिकेच्या कँसरपेक्षा जास्त असतो. चहा कोमट झाल्यावर प्यायला हवा.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews